आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नवीन कलमांची वाढ करण्यात आली. त्यानुसार आता दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
औरंगाबाद रोडवरील एका व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभी बुलाखे व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सदर व्यक्तीच्या घरात ११ मार्च रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी प्रवेश करून घर खाली करण्यासाठी कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच घर खाली करण्याच्या कारणासाठी ११ मार्च रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी त्यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलवून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शिंदे व इतरांनी यापूर्वी देखील फोन करून व घराचे नुकसान करून त्यांना घर खाली करण्यासाठी त्रास दिला. या तक्रारीनुसार तोफखाना पोलिसांनी सुरुवातीला नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३४२, ३२४, १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू असताना घेण्यात आलेल्या जबाबानुसार पोलिसांनी ३९५, ३८५ व ३५४ या कलमांची वाढ केली. दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलिसातही नगरसेवक शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे नगरसेवक शिंदेंसह यांच्या अडचणीत वाढ झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.