आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन:रंगपंचमी उत्सवात नियम धाब्यावर, दोन नगरसेवकांसह 12 जणांवर गुन्हे दाखल

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगपंचमी तसेच विविध सण-उत्सवाच्या संदर्भात राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांसह नगर शहरातील १२ जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे, मनोज दुलम, तसेच अभिमन्यू जाधव, महेश सुरेश धनगर, अनिल ढवन, सनी ताठे, रोहित साठे, सार्थक गंधे, जीवन शेळके, सुरज शिंदे, निखिल येमुल, दिनेश फिरके आदींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

नगरसेवक स्वप्नील शिंदे, महेश धनगर, अनिल ढवन, सनी ताठे, रोहित साठे, सार्थक गंधे, जीवन शेळके यांनी वैदुवाडी येथील वृंदावन लॉनच्या पार्किंगमध्ये रंगपंचमी उत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तर नगरसेवक मनोज दुल्लम आणि सुरज शिंदे यांनी नगर-मनमाड रस्त्यावरील मेघनंद लॉन येथे रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन केले होते. या ठिकाणी जाऊन पोलिसांनी परवानगीबाबत विचारणा केली असता, आम्ही कार्यक्रम घेणारच, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. उद्धटपणे बोलून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिमन्यू जाधव आणि दिनेश फिरके यांनी शहरातील बंधन लॉन येथे रंगपंचमी निमित्त ‘रंग बरसे’ या कार्यक्रमाचे विनापरवाना आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर वाहनांची पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या सूचनांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...