आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ८२९ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेतील कामे निकषानुसार होत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे येत आहेत. तथापि, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने योजनेंच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जलसंकटावर मात करण्यासाठी १ हजार ३१३ कोटींचे जलजीवन मिशन जिल्हाभर रावले जात आहे. जिलाया यापूर्वी अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तसेच प्रादेशिक पाणी योजना प्रतिव्यक्ती ४० लिटर निकष ठेऊन आखण्यात आल्या होत्या. आता जलजीवन मिशनअंतर्गत जुन्या योजनांची पुनर्बांधणी करताना प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचा निकष ठेवला आहे.
जिल्ह्यातील ९३१ गावांत ८२९ योजनांच्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. योजना करताना निकष ठरवून दिले आहेत. तथापि, निकषांची परवा न करता कामे घाईत उरकून घेण्याचा प्रकार सुरू आहे. तशा तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त होत आहेत. नगर तालुक्यातील भोरवाडी योजनेसाठी सुमारे १ कोटी ९९ लाखांचा खर्च येणार आहे. योजनेचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी एक मिटर खोदाई झाली नाही, तसेच प्लास्टिकचे पाईपचे अच्छादन करताना, पाईपखाली माती टाकण्यात आली नाही. या कामांच्या चौकशीची मागणी योगेश पानसरे यांनी केली आहे. निकषांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासन गंभीर नसल्याने भविष्यात दुबार खर्च करण्याची नामुष्की ओढावण्याची धास्ती आहे. अशा इतरही तक्रारी जिल्हा परिषदेत दाखल होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.