आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिका:श्रेय लाटण्यासाठी आमदारांचा आयत्या पिठावररेघोट्यांचा केविलवाणा प्रयत्न, भाजप शहराध्य दत्ता काले यांची टिका

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव शहरातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, नगरपालिका, पंचायत समिती इमारत, बाजार ओटे, गोकुळनगरी पूल, शहर अंतर्गत रस्ते, फायर स्टेशन, वाढीव पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक वाचनालय, नवीन अग्निशामक आदिंसह कोट्यवधीची कामे ही भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी निधी मिळवत उभी केली. त्याचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदार आशुतोष काळे हे केविलवाणी धडपड करत आहेत. स्वतःच्या निधीतून एकही ठोस काम त्यांना अडीच वर्षात करता आले नाही, हे अपयश आमदार काळे यांनी कोल्हे यांच्या कार्यकाळातील विकासकामे लोकार्पण करण्याचा घाट घालून सिद्ध केले आहे, अशी टीका भाजप शहराध्य दत्ता काले यांनी केली.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या दृष्टीने शेती व पिण्यासाठी असलेला पाणी प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा राहिला आहे. त्यासाठी वेळप्रसंगी वयाच्या नव्वदीनंतरही त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समवेत मंत्रालयात जाऊन बैठका घेतल्या. कोपरगाव शहरावर आलेल्या प्रत्येक संकटात हाकेच्या अंतरावर असलेला संजीवनी उद्योग समूह हा सर्वप्रथम धावून येतो, कारण शहराची सुबत्ता राखणे हा प्रथम उद्देश कोल्हे गटाचा राहिला आहे. नगरपालिकेत शहराच्या विकासाचे सर्व ठराव हे बहुमताने मंजूर करून कायमच प्रगतीचा विचार जपण्याचे काम कोल्हे गटाने केले असल्याचे दत्ता काले यांनी सांगितले. समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत कोपरगावच्या मानगुटीवर बसवणारे कोण? हे जनतेला ठाऊक असून एकीकडे न्यायालयाने बिगर सिंचन आरक्षणामुळे दिवसेंदिवस शेतीचे पाणी कमी होत असल्याचे निष्कर्ष नोंदवले आहेत. कोल्हे कुटुंबाने वेळप्रसंगी संजीवनीचे प्लांट बंद ठेवून शहराला पाणी पुरविले. विद्यमान आमदारांना स्नेहलता कोल्हे यांच्या काळातील निधी उपलब्ध झालेल्या कामाचे उद्घाटने करून आपला कार्यकाळ साजरा करावा लागत असल्याची टीकाही दत्ता काले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...