आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३७० अपंगाची तपासणी:अपंगत्वाच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील चार विविध बाह्य रुग्ण तपासणी कक्षात बुधवारी ३७० अपंगाची तपासणी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी अपंगाची मोठी गर्दी होती. तपासणीनंतर रुग्णांना फोन करून प्रमाणपत्र घेण्यासाठी तारीख दिली जाते. अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपंग प्रमाणपत्र वितरण विभागाचे प्रमुख दत्तात्रेय धाडगे यांनी बुधवारी दिली.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शासकीय रुग्णालयातून संबंधित अपंगाच्या सर्व चाचण्या केल्या जातात. जिल्हा शासकीय रुग्णालयाने बुधवार हा दिवस खास अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी व तपासणीसाठी राखीव ठेवलेला आहे. नगर शहरासह १४ तालुक्यातून अपंग दर बुधवारी तपासणीसाठी व प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात. बुधवार २४ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षांमध्ये अपंगाची गर्दी होती.जिल्हा शासकीय रुग्णालयातील मतिमंद बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, नाक घसा बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, नेत्र तपासणी कक्ष व हाडाच्या तपासणी कक्षात अपंगांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...