आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी:श्रावणातील तिसरा सोमवार तीर्थ स्थळांवर भाविकांची गर्दी, पर्यटनस्थळे ही गर्दीने फुलले

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार रविवार व सोमवार या सलग तीन सुट्ट्या लागून आल्यामुळे व श्रावणातील तिसऱ्या सोमवारमुळे भाविक तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्राला भेटी देण्यासाठी गर्दी करत आहेत. सोमवारी तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध शिवमंदिरांबरोबरच देशभरातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच भावीक दर्शनासाठी शनिशिंगणापूर मध्ये दाखल होत होते.

शनिशिंगणापूर चौथरा हा महिलांसाठी खुला झाल्यापासून शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या व तिसरा श्रावणी सोमवार यामुळे सोमवारी (आज ) शनिशिंगणापूर मध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी वाढल्याने मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. शिर्डीहून शनिशिंगणापूर कडे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. नेवासे तालुक्यातील देवगड, मोहिनीराज मंदिर, ज्ञानेश्वर माऊली मंदिर या तीर्थस्थळावर देखील आज भाविकांची गर्दी दिसून आली. त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध शिव मंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अहमदनगर शहरातील बेलेश्वर जिल्ह्यातील केदारेश्वर, निझरनेश्वर, यासह विविध महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होती.

नेवासे तालुक्यातील देवगड, मोहिनीराज मंदिर, ज्ञानेश्वर माऊली मंदिर या तीर्थस्थळावर देखील आज भाविकांची गर्दी दिसून आली. त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध शिव मंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अहमदनगर शहरातील बेलेश्वर जिल्ह्यातील केदारेश्वर, निझरनेश्वर, यासह विविध महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होती.

रस्त्याचा अनेक भाविकांना फटका

उत्तर व दक्षिण भारतातून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना नगर -मनमाड रस्त्याने शिर्डीकडे जावे लागते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याचे काम अर्धवट खोदून ठेवल्याने बहुतेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच हलका पाऊस सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्याचा सर्वात मोठा फटका शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना सोमवारी बसला.

बातम्या आणखी आहेत...