आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलेश्वर मंदिरात दर्शन:पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भिंगार येथील बेलेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागलेली होती. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवमंदिरात बम बम भोलेचा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतले. कोरोनानंतर प्रथमच सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी महादेवांच्या मंदिरांत गर्दी केली होती.

शहरातील विविध शिव मंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी सुरू केली होती. नगर शहराजवळील नगर -मनमाड रस्त्यावरील विळद घाट येथील खोपेश्वर, अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण येथील शिवमंदिरे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांच्या गर्दीने खुलून गेली होती. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त या मंदिरांच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिराबाहेर बेल व अन्य पूजाचे साहित्य विक्री करणारे दुकाने थाटण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...