आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादा गाड्यांचे नियोजन:आळंदी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी; बसस्थानकात ताटकळले प्रवाशी

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यापार्श्वभूमीवर नगर शहरातील बसस्थानकात शनिवारी पुणे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली.आळंदीत रविवारी (२० नोव्हेंबर) यात्रा तर मंगळवारी (२२ नोव्हेंबर) माऊली समाधी सोहळा पार पडणार आहे. यात्रेनिमित्त राज्यभरातील भाविक आळंदी दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. परिवहन महामंडळाने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व नेवासे आगारांनी संगमनेर आळेफाटा मार्गे जाऊन चाकण येथून जादा वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जादा वाहतुकीचे नियोजन असतानाही, अपेक्षापेक्षाही अधिक गर्दी झाल्याचे चित्र नगरच्या बसस्थानकात शनिवारी दिसून आले. विभागनियंत्रक मनिषा सपकाळ, वाहतूक अधिकारी अविनाश कल्हापुरे, आगार व्यवस्थापकांनी वाहतुकीचे नियोजन केले. यात्रा कालावधीत ३८६ फेऱ्या होणार आहेत, यासाठी सुमारे ७२ बसेसचा वापर केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...