आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:काष्टी ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू असून काष्टी, बेलवंडी, पारगाव, घोगरगावसह इतर १० गावाची निवडणूक येत्या १८ डिसेंबरला होत असून उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास शेवटच्या दिवशी आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरजीव प्रतापसिंह पाचपुते तर पुतणे साजन पाचपुते व सुदर्शन पाचपुते यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर दत्तात्रय पाचपुते यांनी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केला असून शेवटच्या दिवशी उमेदवारांनी गर्दी केली होती. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज आल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, काष्टी सोसायटीचे माजी चेअरमन कैलास पाचपुते आणि युवक नेते साजन पाचपुते यांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांचे अर्ज भरून घेतले आहेत. असे चित्र राहिले तर काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत ३ पॅनल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आशिया खंडातील सर्वात मोठी असणारी काष्टी सहकारी सोसायटी पाचपुते यांच्या ताब्यातून जाऊन नागवडे गटाच्या कैलास पाचपुते यांच्या ताब्यात गेल्याने नागवडे गटाची ताकद काष्टी मध्ये वाढली आहे. परंतु नागवडे गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत कशा पद्धतीने सक्रिय होतात त्यावर काष्टी गावचे गणित अवलंबून असणार आहे.

दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत चुरस प्रतिष्ठेची व अस्तित्वाची लढाई मागील उपसरपंच निवडीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा शब्द डावलून दुसरा उपसरपंच झाल्याने तेव्हापासून त्यांचा गावात वचक कमी झाल्याचे दिसून आले. त्यातच पाचपुते यांचे खंदे समर्थक त्यांना सोडून नागवडे गटाला मिळाले असल्याने काष्टी ग्रामपंचायत निवडणुक आमदार पाचपुते यांच्या प्रतिष्ठेची तर विरोधकांच्या अस्तित्वाची असेल हे मात्र नक्की.

बातम्या आणखी आहेत...