आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आपला गणपती गणेश मित्र मंडळा'कडून सांस्कृतिक कार्यक्रम:खतरो के खिलाडीला तुफान गर्दी, अन् पारंपरिक खेळांना मोठा प्रतिसाद

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर-पारनेर तालुक्यातील निघोज येथील 'आपला गणपती' या गणेश मंडळाने परिसरातील महिला भगिनी व मंडळाचे सदस्य तसेच बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. गेल्या पाच दिवसात खतरों के खिलाडी अन् पारंपरिक खेळांनाही प्रतिसाद मिळत आहे.

दररोज या मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. संगीत खुर्ची, कांदा मॅरेथॉन, चमचा लिंबू, मडके फोडणे, दांडिया स्पर्धा यासाठी शेकडो स्पर्धकांनी भाग घेऊन आनंद घेतला. नाशिक येथील खतरो के खिलाडी या शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जाळातून उंच उडी मारणे आदी विविध कसरतींचे प्रयोग करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक खेळ लुप्त होत आहेत. या खेळांची भावी पिढीला ओळख व्हावी या उद्देशाने हे साहसी खेळ घेण्यात आले. या उपक्रमास मुलांसह पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

पालकांनीही घेतला आनंद

लहानपणी मित्र मैत्रिणी सोबत खेळलेला खेळ काळाच्या ओघात विसरत गेले. मात्र गणेशोत्सवात आपला गणपती मित्र मंडळाने या खेळांना पुन्हा उजाळा दिल्याने मुले खेळत असताना उपस्थित पालकांनाही या खेळाचा मनमुराद आनंद घेतला. संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कलाकारांचा सत्कार केला.

कार्यरत अध्यक्ष-सदस्य

मंडळाचे अध्यक्ष रवी रणसिंग, उपाध्यक्ष नागेश अनंत, सचिव रोहित पठारे, कार्याध्यक्ष महेश ठाणगे, खजिनदार दीपक साबळे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सदस्य शुभम शेवाळे, माऊली मूळे, संदिप साबळे, सचिन शिरवले, गणेश हरेल,चंदा उचाळे, अशोक वैरागर, मच्छिन्द्र गुंड, रिकी सोनवणे, आशिष सुरकुंडे, नामदेव पढेकर, संकेत लाळगे कार्यरत आहेत.

मंडळाचे मार्गदर्शक

या मंडळाला संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सरोदे, माजी सरपंच ठकाराम लंके, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक भास्कर सोनवणे, बाळासाहेब मावळे, कचरु मामा गायकवाड, विश्वास गायकवाड, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, भाऊसाहेब गाडेकर आदी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...