आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:उखाणा सारख्या स्पर्धांतू संस्कृती टिकून राहणार ; नगरसेविका शीतल जगताप यांचे प्रतिपादन

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण उत्सव संस्कृतीचे व परंपरेचे जतन करण्यासाठी व महिलांना एकत्रित आणून आपल्या विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी घेण्यात आलेला उखाणा स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद आहे. संस्कृती व पारंपरिक पद्धती महिला विसरत चालल्याने अशा उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन नगरसेविका शीतल जगताप यांनी केले.

महाराष्ट्राला लाभलेल्या परंपरा व संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी बैलपोळा उत्सवानिमित्त महिलांसाठी उखाणा स्पर्धेचे आयोजन केसरी सोशल फाउंडेशनच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी तोफखाना पोलिस स्टेशनचे निरीक्षक ज्योती गडकरी, नगरसेविका शोभा बोरकर, नगरसेविका संध्या पवार, आरजे चैत्राली, ऐश्वर्या शहा, दीप्ती शुक्रे, सुमित कुलकर्णी, तेजल परमार, रूपाली लोखंडे अंजली आव्हाड, शारदा होशिंग, डॉ. शामा मंत्री, रूपाली देवी आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमास्थळी खिल्लारी बैलांची जोडीची पूजा करण्यात आली व मंगळागौरीच्या खेळाचा कार्यक्रम घेण्यात आले. उखाणा स्पर्धेमध्ये २५० महिलांनी सहभाग नोंदवला होता.उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची देशमुख, द्वितीय आरती संतारे, तर तृतीय श्रद्धा पाटील यांनी पटकावला. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत शामन इंगळे विजेते ठरले.लकी ड्रॉमध्ये मंदाकिनी नन्नवरे यांच्या नावाची चिठ्ठी निघून त्यांना सोन्याची नथ देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...