आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:चांगले विचार पेरण्यासाठी सायकल यात्रा महत्त्वाची

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील ६५ कोटी तरुणांनी ठरवले तर देशाचे सुराज्य अल्पावधीत बनू शकते.त्यासाठी संविधान आणि महात्मा गांधी तरुणाईत पेरावे लागतील. ही पेरणी करण्यासाठी अनुभूती सायकल यात्रा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. स्नेहालय पुनर्वसन संकुलात शनिवारी सकाळी ७ वाजता अनुभूती सायकल यात्रेला महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रारंभ झाला. मनोज पाटील बोलत होते.

अवतार मेहरबाबा ट्रस्टचे पदाधिकारी मेरनाथ कलचुरी, युवा निर्माण प्रकल्पाचे मार्गदर्शक नितीन लक्ष्मीकांत थाडे, स्नेहालयाचे सचिव राजीव गुजर, अनामप्रेम संस्थेचे अध्यक्ष अजित माने, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, नगर सायकलिस्ट असोसिएशनचे चंद्रशेखर मुळे, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले १५० सायकल यात्री उपस्थित होते.

स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्पाने गांधीजींच्या १५३ व्या जयंती निमित्त सायकल यात्रेचे नियोजन केले आहे. २५० किलोमीटर अंतराच्या या सायकल यात्रेत ५ सामाजिक प्रकल्प आणि पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, यांच्यासह १० समाजसेवकांशी संवाद आयोजिला आहे. विविध गावातील सायकल यात्री किमान पाच किलोमीटर अंतर यात्रेसोबत सायकल चालवणार आहेत. १००० तरुणांना जगण्याचे ध्येय देण्याचा यात्रेचा संकल्प आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाने या उपक्रमात विशेष योगदान दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...