आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी:35 लाख ऑनलाइन भक्तांच्या उपस्थितीत शिर्डीत साईबाबांची दररोज हाेतेय पूजा

शिर्डीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चेत कोणताही खंड नाही

(नवनाथ दिघे)

जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिर कोरोना विषाणूमुळे १७ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र साई मंदिरात दैनंदिन पूजा व चार आरत्या नियमितपणे आहेत. याचे लाइव्ह चित्रीकरण देश-विदेशातील साईभक्तांना घरबसल्या दिसते. या ऑनलाइन साईदर्शन सुविधेचा दररोज ३५ लाख भाविक लाभ घेत आहेत. लॉकडाऊन काळात सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी साई संस्थानचे अॅप डाऊनलोड करून घेतले आहे.

साईबाबांच्या शिर्डीत गेल्या कित्येक वर्षांपासून दररोज सरासरी एक लाख भाविक साई समाधीचे दर्शन घेत असतात. वर्षाकाठी भाविकांच्या गर्दीचा हा आकडा ३ कोटींवर गेला आहे. भारतातील सर्वाधिक धार्मिक पर्यटकांची गर्दी असलेले ठिकाण म्हणून गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. साईबाबांना ऑनलाइन २ कोटी ५३ लाख ९७ हजार रुपयांची देणगीही ४८ दिवसांत जमा झाली आहे.

पूजा आणि आरत्या :

साईबाबा समाधी मंदिर पहाटे ४ वाजता सुरू होते. पहाटे ४.१५ वाजता भूपाळी, ४.३० वाजता काकड आरती, ५ वाजता बाबांना स्नान, ५.३० वाजता भजन आणि साईबाबांना लोण्याचा प्रसाद, सकाळी ७ वाजता समाधी अभिषेक, मध्यान्हाला दुपारी १२ ते १२.२५ दरम्यान आरती होते. साईबाबांना नैवेद्य व पानाचा विडा दिला जातो.

धुपारती :

धुपारती दररोज सूर्यास्तावेळी केली जाते. साईबाबांना नैवेद्य दाखवला जातो. २० मिनिटांची आरती असते.

पूजेत कोणताही खंड नाही

साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा व सर्व आरत्या विधिवतपणे सुरूच असून त्यात कोणताही खंड नाही. तसेच साईबाबांच्या लाइव्ह दर्शनाचा लाभ भाविकांना होत आहे. अरुण डोंगरे, (आयएएस) मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी    

बातम्या आणखी आहेत...