आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर तालुक्याची दुष्काळावर मात करत प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्याच्या प्रगतीत दूध व्यवसायाने मोठे योगदान आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी व पायाभूत रचनेतून तालुक्यात दैनंदिन ७ लाख लिटर दूध उत्पादित होत असल्याची माहिती महानंद व संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली. तालुक्यातील शिरापूर येथे दूध सागर संस्थेच्या नवीन इमारत भूमिपूजन व मल्हार घाट स्वागत कमानीचे लोकार्पण प्रसंगी देशमुख बोलत होते. ॲड. नानासाहेब शिंदे, कैलास पानसरे, विलास कवडे, संतोष मांडेकर, धनराज पारासुर, योगेश पवार, सुशिल पारासुर, कचरू पवार, दुध संघाचे कार्यकारी अधिकारी डॉ. सुजित खिलारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, तालुक्यात दूध व्यवसाय भरभराटीस आहे. दूध सागर संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू ठरली आहे. संस्थेचे कामकाज वाखाण्याजोगे असून नूतन इमारत शिरपूरच्या सौंदर्यात भर टाकणार आहे. गावाने मंत्री थोरात यांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास दाखवला. त्यांच्या नेतृत्वाखाली येथे अनेक विकास कामे होत आहे. तर मल्हार घाट पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.