आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लग्नाचे आमिष दाखवून दलित महिलेवर अत्याचार

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे शहरातील अतिक कुरेशी याने दलित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानव्ये व बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अतीक गुलाब कुरेशी रा. खाटीक मोहल्ला श्रीगोंदे याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

याबाबत पोलिस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली. यात पीडितेच्या पतीचे ऑगस्ट २०२१ मध्ये निधन झाले. दोन महिन्यांनी आरोपी अतीक गुलाब कुरेशी याने पीडित महिलेच्या घरी जाऊन माझे माझ्या पत्नीशी पटत नसल्याने मी तिला आता तलाक देऊन तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगत पीडितेवर राहते घरी अत्याचार केले. लग्नाचे आमिष दिल्याने पीडित महिलेने आरोपीच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही.

आरोपी आतिक कुरेशी हा तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. एप्रिल २०२२ आरोपी अतीक कुरेशी हा त्याची स्कर्पीओ क्र. एमएच १६ व्हीवाय ५१५५ ही गाडी घेऊन माझ्या घरी आला होता. त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने मला त्याच्या गाडीमधून जामखेड रोडने कुकडी केनोल १४ नंबर चारीच्या रस्त्याकडे घेऊन गेला. गाडी थांबवून त्याने तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत गाडीमध्येच अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने आरोपी आतिक कुरेशी याच्या विरोधात श्रीगोंदे पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आतिक कुरेशी याला अटक केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...