आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:नैसर्गिक प्रवाहाला घातला बांध; तहसीलदारांच्या नोटीसा

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

३१ तारखेच्या दैनिक दिव्य मराठीच्या अंकात शेतातच पाण्याचे तळे साचल्याने पांढऱ्या सोन्याचे झाले पाणी या मथळ्याखाली शेतकऱ्यांची व्यथा मांडल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीसा बजावल्या असून सर्व गावातील तलाठी, मंडलाधिकारी यांना अतिक्रमाणित झालेले नैसर्गिक प्रवाह खुला करावा अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

दिवाळीपूर्वी तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली अन जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले.पाऊस उघडून आठ दिवस झाले मात्र आजही अनेक शेतात पाणी साठून राहिल्याने पांढरे सोने अन सोयाबीनचे पाणी झाले असल्याने शेतकऱ्यांची माती झाली आहे.अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते.त्यावर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यात म्हटले आहे, श्रीरामपूर तालुक्यात माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे अतिक्रमणामुळे अनेक गावांतील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतावर असलेल्या रहिवासी वस्त्यांमध्ये पाणी घुसून विषारी साप, विंचू यांचा वावर वाढल्याने तेथील शेतकऱ्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.

उपरोक्त परिस्थिती दरवर्षी उद्भभवत आहे व यामुळे बाधित शेतकरी पावसाचे पाणी साचल्यानंतरच तक्रारी करत असल्याचे व पाणी ओसरल्यावर पुन्हा वर्षभर या समस्येबाबत अर्थात नैसर्गिक पाण्याचे प्रवाह कोणी अडविल्यास त्याविरुद्ध दाद मागण्याची तरतूद मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ मध्ये नमूद असताना कोणताही कायदेशीर अर्ज या कार्यालयाकडे दाखल करण्यात स्वारस्य दाखवत नसल्याची बाब देखील अधोरेखित झाली. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी आपणही पाठपुरावा करणार आहोत, असे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...