आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव या संस्थेने बेकायदेशीररित्या काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन पूर्वीप्रमाणे सभासदत्व बहल करावे या मागणीसाठी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (९ नोव्हेंबर)ला नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे घेऊन धरणे आंदोलन केले.
पतसंस्थेचे कर्मचारी सतीश भुजबळ, बाळासाहेब जावळे, श्रीराम वाकचौरे, बाबासाहेब वाकडे, अमोल गारुडकर, शंकर जारकड, रघुनाथ लाड, किशोर काळे, कैलास अभंग, ज्ञानेश्वर बडधे, विजय ढवण यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव या संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी एप्रिल २०२१ रोजी संपलेला आहे.
कोविडमुळे संस्थेच्या संचालकांची मुदत वाढवण्यात आली होती. मुदत संपलेल्या संचालक मंडळाने दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त कामकाज करू नये, असा संकेत असतानाही कामकाज झाले. संस्थेच्या स्थापनेपासूनच्या सभासदांचे सभासदत्व रद्द केले गेले. या निर्णयाला प्रगती देऊन पूर्वीप्रमाणे सभासदत्व बहाल करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान रद्द केलेले सभासदत्व पुन्हा बहाल करण्यात येत नाही, तोपर्यंत संस्थेच्या निवडणूक कालावधी वाढवू नये. अशी मागणी यावेळी सतीष भुजबळ यांनी केली आहे.
याबाबत संचालक मंडळाला यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या विनंतीवरून २७ ऑक्टोबरचे आंदोलन आम्ही स्थगित केले होते. मात्र दखल घेतली गेली नाही त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन सुरू केले आहेत. असे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.