आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:आश्वी खुर्द येथील विद्यानिकेतनमध्ये गणेशोत्सवानिमित्त नृत्याचे कार्यक्रम

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे, या निमित्त विद्यालयात दररोज सकाळी, संध्याकाळी श्री गणेशाचे पूजन व आरती होते तसेच विविध सहशालेय उपक्रमा अंतर्गत ( सीसीए) नृत्य स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य सयराम शेळके सरांनी दिली.

विद्यालयात नृत्य स्पर्धेचे इयत्ता ५ वी व ६ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाग घेउन विविध सामाजिक लोककलांवर आधारित नृत्य सादर केले. तर इयत्ता ७ वी ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्यांचा कार्यक्रम सादर केला. श्री गणेशाच्या आरास मध्ये देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त विविध देखावे तयार केले या मध्ये महात्मा गांधी यांची दांडी यात्रा, भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या बलिदानाची माहिती आणि चित्र विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक पालक उपस्थित होते. या साठी वर्ग शिक्षकांनी, सांस्कृतिक विभागाने विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डी. एस. सिनारे , पर्यवेक्षिका सातपुते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...