आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक इमारत:शाळेची धोकादायक इमारत उतरवली ; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाची कारवाई

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तोफखाना परिसरातील धोकादायक बनलेली मनपा शाळेची इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली. सदर इमारतीचा पाया खचलेला होता. पावसामुळे इमारत पडण्याची शक्यता होती. त्यामुळे ती उतरवून घेण्यात आल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुमारे १२० इमारतींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच पावसामुळे अपघात घडून इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने अशा इमारती उतरवून घेण्यात येत आहेत. तोफखाना परिसरातील मनपा शाळा नंबर २३ दादासाहेब रुपवते विद्यालयाची इमारत धोकादायक बनली होती. इमारतीचा पाया खचल्याने भींतीला तडे गेले होते. त्यामुळे ती उतरवून घेतल्याचे इथापे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...