आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक भागात एलईडी पथदिवे बसवण्याचे सुरु असलेले काम साहित्य उपलब्ध नसल्याने ठप्प आहे. मोठा गाजावाजा करुन शहरात एलईडी बसविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु आजही अनेक भागात एलईडी बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिव्याखाली अंधार असाच प्रकार सुरू अाहे, अशी टीका भाजप शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी केली. पथदिवे बसविण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन द्यावे, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष गंधे, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, नगरसेवक मनोज दुलम, उदय कराळे, ज्ञानेश्वर काळे, कुंडलिक गदादे, मल्हार गंधे, सुमित इपलपेल्ली आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या २-३ महिन्यांपूर्वी स्मार्ट एलईटी बसवण्याचे काम झाले. सुमारे ७० ते ८० टक्के भागात एलईडी बसवून झाले. मात्र, अद्याप बऱ्याच ठिकाणी साहित्याअभावी काम होत नसल्याने परिसर अंधारातच आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता साहित्य नसल्याने काम थांबवल्याचे सांगण्यात आले. यात प्रशासन व ठेकेदाराची चूक असल्याचे स्पष्ट आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन हे काम तातडीने पूर्ण घ्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गंधे यांनी यावेळी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.