आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोडा दत्त नाम टाहो:दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो; नगरमध्ये जंयतीनिमित्त मंदिरे भाविकांनी गजबजली

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्त जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील वेदांत नगर येथील दत्त मंदिरात बुधवारी (7 डिसेंबर) ला पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर' चा जय घोष करत शहरातील सर्व मंदिरांमध्ये दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते. नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते.

दत्त जयंतीनिमित्त सावेडी येथील वेदांत नगर दत्त मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर तपोवन रोडवरील मंदिरात देखील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वेदांत नगर येथील दत्त मंदिरात कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. पहाटे विधिवत पूजनानंतर भाविकांना दर्शनासाठी रांगेतून सोडण्यात येत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिरात गेल्या दोन दिवसापासून दत्त जयंती उत्साहाची तयारी सुरू होती. मंगळवारी रात्रीपासूनच भाविक देवगड मध्ये दाखल होत होते. बुधवारी सकाळी देवगड परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मराठवाड्यातील औरंगाबाद सह व अन्य परिसरातून भाविक दर्शनासाठी आले होते.

त्याचबरोबर शहरातील विविध श्री स्वामी समर्थ मंदिरात देखील दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद वाटप व अन्य कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्सव सोहळा पार पडला.

दरम्यान अहमदनगर शहरातील तपोवन येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...