आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:तळेगावमळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय जाधव, उपाध्यक्षपदी नामदेव दुपके बिनविरोध

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळेगावमळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यात परजणे गटाचे सर्वच्या सर्व ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून संस्थेचे अध्यक्ष म्हणून दत्तात्रय ज्ञानदेव जाधव, तर उपाध्यक्ष म्हणून नामदेव मंजाहारी दुपके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तळेगावमळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एक नावाजलेली संस्था असून ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. ज्ञानदेव दुपके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने शेतकऱ्यांसाठी भरीव स्वरूपाचे योगदान दिले. अनेक वर्षापासून संस्थेवर स्व. नामदेवराव परजणे यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. यंदाही ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये दत्तात्रय ज्ञानदेव जाधव, नामदेव मंजाहारी दुपके, काशिनाथ भाऊसाहेब दुपके, आसाराम कारभारी दुपके, अशोक नामदेव दुपके, दिलीप वाल्मिक पिंपळे, सोपान गंगाधर उकिरडे, चांगदेव रामा भवर, पोपट किसन पुरी, लिलाबाई काशिनाथ दुपके, इंदुबाई ज्ञानदेव जाधव यांचा समावेश आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सावंत यांनी काम पाहिले. याकामी त्यांना संस्थेचे सचिव साहेबराव निकाळे यांनी सहकार्य केले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते कोपरगाव बाजार समितीचे संचालक दादा दुपके, संजय ज्ञानदेव दुपके, वाल्मिकराव पिंपळे, बाळासाहेब विठ्ठल दुपके, अशोक कडू दुपके, दादासाहेब गंगाधर दुपके, पिरताराम दुपके, बाळासाहेब दगडू दुपके, संजय पांडुरंग टुपके, रघुनाथ दुपके, दिगंबर दुपके, गंगाधर दुपके, दादा सोपान दुपके, गमाजी पवार, अनिल वाकचौरे, अशोक बर्डे, रामजी वैद्य यांनी सहकार्य केले. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, खासदार डॉ. सुजय विखे, गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संचालक राजेंद्रबापू जाधव यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...