आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेस अक्राॅस अमेरिका' सायकल स्पर्धा:अहमदनगरच्या 56 वर्षीय शरद काळेंचा समावेश; जगभरातील 2000 स्पर्धक होणार सहभागी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लंडनमध्ये 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार स्पर्धा, दीड हजार किलोमीटर अंतराच्या सायकल स्पर्धेत जगभरातून दोन हजार स्पर्धक होणार सहभागी, भारतातून 150 स्पर्धक जाणार

जगातील सर्वात खडतर सायकल स्पर्धा असलेल्या 'रेस अक्राॅस अमेरिका' या सायकल स्पर्धेत अहमदनगरचे ५६ वर्षीय शरद काळे सहभागी होणार आहेत.लंडनमध्ये ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. दीड हजार किलोमीटर अंतराच्या सायकल स्पर्धेत जगभरातून दोन हजार स्पर्धक होणार सहभागी होणार असून,भारतातून १५० स्पर्धक जाणार आहेत.

लंडन-एडनबर्ग-लंडन अशी ही सायकल स्पर्धा असून, सव्वाशे तासांत १५३० किलोमीटर अंतर दररोज पाच दिवस पाच तासांत पार करायचे आहे. लंडन येथे ७ ते १२ ऑगस्ट या कालावधीत स्कॉटलंड या शहरापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. लंडन ते एडनबर्ग ते पुन्हा लंडन अशी १५३० किलोमीटर अंतर ही सायकल स्पर्धा आहे. सव्वाशे तासांत दररोज पाच दिवस पाच तास ही स्पर्धा जिंकण्यासाठी सायकल चालवावी लागणार आहे. विजेत्या स्पर्धकाला लंडन-एडनबर्ग-लंडन (एलईएल) हे मेडल मिळणार आहे. स्पर्धेसाठी अहमदनगर येथील शरद काळे यांची निवड झाली असून, मोटर सायकल स्पर्धेत यापूर्वी काळे यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.

भारताचा झेंडा फडकवणार...

लंडन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तयारी सुरू असून, शंभर, तीनशे ,सहाशे, एक हजार किलोमीटर पर्यंत सायकल चालवण्याची प्रॅक्टिस केली आहे. या स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावून येणार असल्याचा विश्वास ५६ वर्षीय शरद काळे यांनी व्यक्त केला.

दर चार वर्षांनी होते स्पर्धा

लंडन येथे दर चार वर्षांनी ही सायकल स्पर्धा होते. २०१३ मध्ये भारतातून दहा स्पर्धक सहभागी झाले होते त्यापैकी एकाने ही स्पर्धा जिंकली आहे. २०१७ मध्ये भारतातून ५० स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये दहा स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. भारतात आतापर्यंत ११ जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली असून २०२१ मध्ये ही स्पर्धा होणार होती. मात्र कोरोनामुळे ती होऊ शकली नाही. त्यामुळे २०२२ मध्ये ही स्पर्धा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...