आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:हिवाळ्यात कृषिपंपासाठी दिवसा वीज पुरवठा द्यावा; शेवगाव तालुका आम आदमी पक्षाची मागणी

शेवगाव शहर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात किमान तीन महिने शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी दिवसा वीज देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी शेवगाव तालुका वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात शेतकऱ्यांकडून गहू, कांदा, हरभरा व भाजीपाला यासारखी पिके घेतली जातात. रब्बी हंगामातील बहुतेक पिकांना पाणी द्यावे लागते. या पिकांना हे शेतात उभे राहूनच पाणी द्यावे लागते. हिवाळ्यात दवबिंदू होण्यापर्यंत तापमान खाली जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देणे जिकरीचे व त्रासदायक बनले आहे.

हिवाळ्यातील डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात बऱ्याच जिल्ह्यात तापमान हे तीन ते चार अंश इतके कमी झाल्याचे पाहावयस मिळालेले आहे.अशा परिस्थितीत रात्री कडाक्याच्या थंडीत शेती पिकांना पाणी देताना शेतकऱ्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे व शेतकऱ्यांना विविध शारीरिक आजार होत आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मिळावी ही मागणी बऱ्याच वर्षापासून होत आहे. सरकारने हिवाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत तरी निदान शेतीसाठी दिवसा वीज पुरवावी जेणेकरून शेतकऱ्यांचा त्रास व कष्ट कमी होतील, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

मागणी एक डिसेंबर पर्यंत मंजूर न झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारण्यात येईल. तसेच कृषी मंत्र्यांच्या सिल्लोड तहसील कार्यालया व शेवगाव तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आम आदमीपार्टी तर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटक शरद शिंदे, तालुकाध्यक्ष अशोक लोंढे, दादा बोडके,संजय डोंगरे, विकास टट्टू,नारायण पायघन,शिवाजी मगर आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...