आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मात मृत्यूची नोंद:चंदनापुरी घाटात ज्येष्ठ पत्रकार टंकसाळे यांचा मृतदेह आढळला

संगमनेर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पत्रकार व वृतपत्र विक्रेते सुरेश भागवत टंकसाळे (वय ६०, बोटा, ता.संगमनेर) यांचा मृतदेह बुधवारी चंदनापुरी घाटातील वळणावर आढळला. विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या संदर्भात आकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिसांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे हृदयविकाराने निधन झाले होते.

त्यामुळे ते अधिक खचले होते. वर्तमानपत्र विक्रेते म्हणून काम करताना त्यांनी पत्रकारिता रुजवली. बोटा गावात पोस्ट खात्यात काम करताना वर्तमान पत्राचे काम यशस्वीपणे पार पाडत समाजातील प्रश्नांना वाचा फोडली. संघर्ष करत प्रगती साधली. संगमनेर पोस्टात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृतपत्र विक्रेते ते पत्रकार हा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...