आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा कर्मचारी पतसंस्थेला १०० वर्षांची उज्वल परंपरा आहे. पतसंस्थेने नेहमीच सभासदांचे हीत जोपासण्याचे काम केले आहे. सभासदांच्या आरोग्य सुविधेसाठी वैद्यकीय मदत पतसंस्थेच्या वतीने देण्यात येते. पतसंस्था आता स्वभांडवली झाली असून सभासदांना व्याजदर कमी करण्यात आले आहे. सभासदांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व लग्न सोहळ्यासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते, असे प्रतिपादन चेअरमन अजय कांबळे यांनी केले.
पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदतीचा धनादेश चेअरमन कांबळे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन कैलास चावरे, संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सतीश ताठे, विकास गीते, किशोर कानडे, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, बाळासाहेब गंगेकर, संचलिका प्रमिला पवार, उषाताई वैराग, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
मयत सभासद भीमराज कोतकर, सतीश रोहोकले, बाळू वैराळ यांचे प्रत्येकी १ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या विषयांची सूचना संचालक बाळासाहेब पवार यांनी मांडली. तर सोमनाथ सोनवणे यांनी अनुमोदन दिल्याचे मुदगल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.