आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल सादर करण्याच्या सुचना:हार, फुलांवरील निर्बंधांबाबत अहवालानंतर घेणार निर्णय; शिर्डीतील वाद महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची माहिती

शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री साईबाबा मंदिरात हार, फुले निर्बंधांवरुन निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सुचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्या. हार, फुलांवरील निर्बधांबाबत धोरण ठरवणारा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शासन स्तरावरुन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारच्या आंदोलनात फुल उत्पादक आणि शिर्डीच्या शांततेला तसेच या पवित्र ठिकाणाला बदनाम करणारे खूप होते. त्यामुळे या घटनेचा शब्दात निषेध करुन मंत्री विखे म्हणाले, कोणाच्या आधाराने या प्रश्नाचे राजकीय भांडवल करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर तेही आम्ही सहन करणार नाही. जिल्हाधि‍काऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत पोलिस अधीक्षक, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व घटकांशी चर्चा करुन, तसेच हार, फुले आणि प्रसाद मंदिरात नेण्याबाबत नियमावली तयार करण्याचे अधिकार या समितीला दिले आहेत.

समितीचा एक महिन्यात येईपर्यंत मंदिरात हार, फुले नेण्याबाबतचे निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट करुन, मंत्री विखे म्हणाले, विश्वस्त समितीतील सदस्यांशी चर्चा झाली. याप्रसंगी जिल्हाधि‍कारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त जयंत जाधव, एकनाथ गोंदकर उपस्थित होते.विश्रामगृहात मंत्री विखे यांनी ग्रामस्थ व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांसह संवाद साधला. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी, भाविकांची होणारी लूट यांसह अन्य प्रश्नावर चर्चा झाली. शिर्डी शहरात स्ट्राईकींग फोर्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहरातील सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्तावही संस्थानने शासनाकडे पाठवल्यास त्याला मान्यता देण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.मंत्री विखे म्हणाले, मंदिरात फुले, हार विक्रीबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे या विषयावर घाईने निर्णय करण्यापेक्षा सर्वांशी चर्चा करुन, सुवर्णमध्य काढणे योग्य ठरेल. यासाठीच समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सातबारावर नोंद असलेल्यांना परवानगी
संस्थानचे विश्वस्त मंडळही या विषयात सकारात्मक आहे. फुल उत्पादकांची सहकारी संस्था स्थापन करुन, संस्थानने त्यांच्याकडून फुलांची खरेदी करावी असा पर्यायही सुचवला आहे. ४०० ते ५०० फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही प्रश्न यावर अवलंबून आहे. सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच फुले विक्री करण्याची परवानगी देण्याबाबतही मंत्री विखे यांनी बैठकीत सुचित केले.

शिर्डीत ‘झिरो टॉलरन्स” धोरण राबवा
शिर्डी शहर व परिसरातील विविध समस्यांबाबतही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले, विविध अवैध धंद्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीबाबत पोलिस प्रशासनाने कडक धोरणाचा अवलंब करुन गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करावे यासाठी शिर्डीत झिरो टॉलरन्स धोरण राबवावे, अशा सूचना मंत्री विखे यांनी यावेळी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...