आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:दिव्यांग क्रिकेटपटूंच्या भविष्यासाठी क्रिकेट अकादमी स्थापण्याचा निर्णय

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग क्रिकेटपटूंच्या भवितव्यासाठी अध्यक्ष करीम पटेल यांच्याशी चर्चा करून दिव्यांग क्रिकेट अकादमी करण्याचा निर्णय दिव्यांग क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला.

दिव्यांग क्रिकेट नियामक मंडळाची २४ जुलै रोजी आग्रा येथील अमर हॉटेल येथे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यात डीसीसीबीआयचे अध्यक्ष इक्रांत शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी गझल खान, सचिव संस्थापक हारून रशीद, अध्यक्ष मुकेश कांचन व सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत २४ राज्यांसह मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशनने सहभाग घेतला. मुंबई अपंग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जमीर पठाण, उमैदुल्ला खान आणि सुमीत राहिल या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सर्व २४ राज्यांचे ४ झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा यांना पश्चिम विभागात स्थान देण्यात आले.

सर्व झोनसाठी एका प्रमुखाची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विभागासाठी उत्तम मिश्रा यांना प्रमुख करण्यात आले आहे. मुंबई दिव्यांग क्रिकेट असोसिएशन सर्व दिव्यांग क्रिकेटपटूंच्या भवितव्यासाठी मजबूत आणि मोठा निर्णय घेईल आणि सर्व खेळाडूंना मानक क्रिकेट सुविधा देण्याचा निर्णय घेतील.

बातम्या आणखी आहेत...