आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना चाचण्या कमी झाल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देखील घटले असून शुक्रवारी (ता. 3) दिवसभरात अहमदनगर शहर व जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
गेल्या वर्षी जून महिन्यात अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दैनंदिन 3 हजार 500 कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. आता मात्र केवळ 100 ते 140 दैनंदिन चाचण्या होत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज 800 ते 1200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे.
गेल्या महिन्याभरात शहर व जिल्ह्यात दैनंदिन सात पेक्षाही कमी रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून, बहुतांशी खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचण्या करण्याचे काम बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर अँटीजेन चाचण्या देखील घटविण्यात आलेल्या आहेत. 22 मे ते 3 जून या दहा दिवसांच्या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, दहा दिवसांपैकी दोन दिवस एकाही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली नाही.
पॉझिटिव्ह रेट 8.91 टक्के
वर्षभरापूर्वी होता 18 टक्के होता आता पॉझिटिव्ह रेट 8.91 टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 44 लाख 35 हजार 731 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात 3 लाख 94 हजार 908 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत 7 हजार 225 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 87 हजार 668 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.