आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यात पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली:आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा; शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढली

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील एकूण पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली आलेला असून पूर्व मोसमी पावसाने जिल्ह्यात अद्यापही हजेरी लावली नाही. यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढली आहे. असून आता मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या धरणात किती साठा?

आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा धरणात 32 टक्के तर मुळा धरणात 35 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात सध्या 54 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या व सर्वाधिक क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा घट झाली असून, या धरणात 9 हजार 232 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणात 3 हजार 618 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. निळवंडे धरणात 2 हजार 846 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आढळा धरणात 436 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात 55.50 टीएमसी पाणीसाठा आहे. उजनी धरणात दीड टक्के पाणीसाठा असून, कोयना धरणात 16 टक्के पाणीसाठा आहे.

पावसामुळे शेतकरी चितांतूर

अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील एकूण पाणीसाठा 35 टक्क्यांच्या खाली आलेला असून पूर्व मोसमी पावसाने जिल्ह्यात अद्यापही हजेरी लावली नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढलेली असून, आता मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी नगर जिल्ह्यासह नाशिक विभागात चांगल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील 13 धरणांत 35 टक्के पाणीसाठा अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या प्रमुख 13 धरणातील एकूण पाणीसाठा 35 टक्के आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये 25 टक्‍क्‍यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मुळा धरणातून आवर्तने पूर्ण

भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत 802 क्‍युसेकने पाणीमुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीच्या सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आली होती. ने पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कालवे आता बंद करण्यात आली आहेत. भंडारदरा धरणातून सध्या प्रवरा नदीपात्रात 802 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. तर कर्जतसाठी महत्वाच्या असलेल्या सिना धरणातून पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले असून, या धरणात सध्या 527 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

बातम्या आणखी आहेत...