आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:पद्मश्री पोपेरे यांनी केले बियाणे बँकेचे लोकार्पण, राहिबाई पोपेरे यांचे मत

अकोले13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासीबहुल व इतर ग्रामीण भागांतून गावोगावी स्थानिक गावरान बियाण्यांच्या बँका निर्माण होत आहेत. आपले स्वप्न आहे की, प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर गावरान आणि देशी बियाणे पोहोचले पाहिजेत. त्याची मुहूर्तमेढ अकोले तालुक्यातून यशस्वीपणे रोवली जात आहे. या उपक्रमातून गावरान बीज शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरात उपलब्ध होणार आहे, याबद्दल मला समाधान वाटतेय. विषमुक्त अन्नधान्य पिकवून व तेच नागरिकांना खायला मिळाले तर आजार आपोआपच दूर पळतील व आरोग्य धोक्यात येणार नाही, असे प्रतिपादन गावरान वेलवर्गीय पिके व भाजीपाला पिकांच्या बियाणे बँकेचे लोकार्पण करताना बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले.

तालुक्यातील जहागीरदारवाडीत मुंबईस्थित एएसके फाउंडेशन व बायफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत गावरान व देशी बियाणे बँकेचे लोकार्पण बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफचे माजी अध्यक्ष व सल्लागार गिरीश सोहनी, राज्य समन्वयक सुधीर वागळे, एएसके फाउंडेशनचे सिद्धार्थ अय्यर, प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने, तुकाराम गभाले, गिधाड संवर्धक शंकर शिंदे, काशिनाथ खोले, संजय पाटील, बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे, अभियंता रामनाथ नवले उपस्थित होते. यावेळी बायफ संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीश सोहनी, राज्य समन्वयक सुधीर वागळे, विषय तज्ञ संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विभागीय व्यवस्थापक जितीन साठे यांनी प्रास्ताविक केले. साठे यांनी सांगितले की, गावरान बीजबँकेसोबतच सकारात्मक विचारांची बँक सुद्धा बायफ तयार करू शकल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी विषय मार्गदर्शक योगेश नवले, प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, मच्छिंद्र मुंढे, सुनील बिन्नर, शुभम नवले, राम कोतवाल, हिरामण खाडे, पंढरीनाथ खाडे, विवेक दातीर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश नवले यांनी केले. प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे यांनी आभार मानले.

देशी बियाणे बँकेचे लोकार्पण करताना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आदी.

बातम्या आणखी आहेत...