आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे सन २०२१-२२ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली आहे.
तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्याला दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी यांच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. शनिवार दि.१ डिसेंबर २०२२ रोजी स्मारक समितीच्या सभागृहात सन २०२१-२२ च्या पुरस्कारांची घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व सचिव उत्तमराव पाटील यांनी घोषित केले.
दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार अभिजित कांबळे (संपादक,महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन, मुंबई), साहित्य पुरस्कार २०२१-२२ दयाराम पाडलोस्कर, गोवा (बवाळ-कथा), प्रा. शिवाजीराव बागल, सोलापूर (ज्ञानमंदिरातील नंदादीप-कादंबरी), डॉ. नारायणा भोसले, मुंबई (देशोधडी -आत्मचरित्र), सारिका उबाळे, अमरावती (कथार्सिस-काव्य), भारत सातपुते, लातूर (आम्ही फुले बोलतोय-बालकाव्य), प्रा. वसंत गिरी, बुलढाणा (तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस-चरित्र), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव, नाशिक (अस्वस्थतेची डायरी-वैचारिक लेखन), डॉ. तुकाराम रोंगटे, पुणे (आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समिक्षा), राकेश सांळुके, सातारा (दख्खण समृद्ध प्रवास-प्रवासवर्णन), योगेश प्रकाश बिडवाई, मुंबई (कांद्याची रडकथा शिवार ते बाजार-संशोधन), डॉ. शिवलिंग मेनकुदळे, पुणे (प्रबोधनाचा वसा आणि वारसा-व्यक्तिवेध). यांना जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी तरवडी, ता. नेवासा येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षीत यांचे हस्ते प्रदान केले जाणार आहेत, अशी माहीती दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष बाबा आरगडे, सचिव उत्तम पाटील यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.