आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसब्याच्या निकालावरून जर देशात बदलाचा मूड आहे, असे समजायचे तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. मग बारामतीची सीट जाईल असे शरद पवारांना म्हणायचे का? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसबा निवडणुकीत आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ शकलो नाही, हे मान्य करतानाच चिंचवडच्या पराभवामुळे बारामती लोकसभेची सीट जाईल असे शरद पवार यांना म्हणायचे आहे का? असा सवाल करतानाच, कसब्याचा वर्षभर आनंद साजरा करायचा तो करा मग 2024 मध्ये मोदी लाट काय आहे हे दिसेलच असे म्हटले आहे. कसब्याच्या निकालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला डिवचले होते. देशाचा मूड बदलाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकांना बदल हवा आहे, हे या निकालातून दिसून येत आहे. या विधानावरुन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, रवींद्र धंगेकर सातत्याने जनतेत होते म्हणू निवडून आले. आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कसब्याच्या निकालाचा वर्षभर काय आनंद साजरा करायचा तो करा. वर्षानंतर मोदी साहेबांची लाट कशी असते हे पुन्हा तुम्हाला दिसेलच. मात्र, पिंपरी-चिंचवडचा काही भाग बारामती मतदारसंघाचा भाग आहे. मग तुमची बारामतीची सीट जाईल असे आम्ही म्हणू का? पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला असताना तुम्ही का हारला याचे आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी शरद पवारांना दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.