आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर गुन्हा:बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी ; सायबर ठाण्यात फिर्याद दाखल

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका संकेतस्थळावर महिलेचे बनावट अकाऊंट तयार करून संबंधीत महिलेची बदनामी केल्याचा प्रकार रविवारी घडला. नगर शहरात राहणाऱ्या पीडित महिलेने या प्रकरणी येथील सायबर ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मेसेजमध्ये ‘कॉलेज गर्ल पुणे’ असे लिहून पाठविले होते. पीडित महिलेला बनावट अकाऊंट तयार केल्याचे समजले. या अकाऊंटवर तिचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही टाकल्याचे दिसून आले. त्यानंतर पीडिताने सायबर ठाण्यात फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...