आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य सार्वत्रिक निवडणुक २०२२ मधे महाविकास आघाडीने “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” दिले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे पुण्यात येऊन नगर व नाशिक जिल्ह्यातील मतदार आपल्यालाच मतदान करणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मतदारांना गृहीत धरून असून त्यांच्या घरातील उमेदवार रिंगणात आहे. आपण महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मोट बांधली आहे.
या निवडणूकीत विरोधी प्रचार प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपप्रणित पॅनलचा पराभव करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्ष प्रवक्ते तथा नगर जिल्ह्याचे निरिक्षक अंकुश काकडे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य निवडणूक २०२२ प्रचारा निमित्त अकोल्यातील जिल्हा बँकेच्या स्व. भाऊसाहेब महादेव हांडे सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात काकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर हे होते. व्यासपीठांवर आमदार डॉ. किरण लहामटे, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, अगस्तिचे उपाध्यक्ष अशोक भांगरे, संचालक मीनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे मनपाचे नगरसेवक व या निवडणुकीचे प्रचार प्रमुख प्रशांत जगताप, उमेदवार महेंद्र पठारे, आकाश झांबरे, नारायण चापके, सोमनाथ लोहार, अजिंक्य पालकर, संजय यादव, संदीप शिंदे, दिपक कामटे, संध्या सोनवणे, सुषमा सातपुते अब्दुल हाफीज, किशोर कांबळे आदींसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, नगरसेविका श्वेताली रूपवते, स्वाती शेणकर, नवनाथ शेटे, सुरेश गडाख, प्रकाश नाईकवाडी, अरूण रूपवते, अनिल कोळपकर, अमित नाईकवाडी, महेश तिकांडे, राजेंद्र कुमकर, प्रकाश मांलुजकर, मनोज मोरे, प्रा. चंद्रभान नवले, नीता आवारी, पुष्पा निगळे, अॅड दत्तात्रय निगळे, सुभाष मालुंजकर, प्रकाश नाईकवाडी, शरद चौधरी, आरीफ शेख, विजय आवारी उपस्थित होते.
आमदार लहामटे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात मी वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यापीठ प्रतिनिधी होतो. विद्यापीठाच्या कामकाजात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किवा महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.
तर अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले म्हणाले, मी ३० वर्षापासून शिक्षण संस्थेत काम करतोय पण जेव्हापासून पुणे विद्यापीठाचे नामकरण झाले तेव्हापासून भाजप यंत्रणेकडून विद्यापीठाच्या कामात अनावश्यक बदल केलेत. आपण सर्वमिळून या निवडणुकीत काळजीपूर्वक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू व महाविकास आघाडीतील उमेदवारांना विजयी करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.