आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळकाढूपणा:अतिवृष्टी अनुदानाचा अहवाल सादर करण्यास जिल्हा प्रशासनाचा विलंब

शेवगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांसाठी शेवगावचे प्रशासन निरुत्साही झाले आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यांचा अततिवृष्टी अनुदानाचा अहवाल सादर झाला असताना येथील प्रशासनाने मात्र यात दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.ऑक्टोबरमध्ये तालुक्यात परतीच्या सतत पावसात व अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला. पेरणीचा हंगाम उरकल्यानंतर झालेल्या जेमतेम पावसाने हे पिके काहीसे नजरेत भरणारे झाले. त्यामुळे उत्पन्नाच्या आशा बळावल्या होत्या. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खत, फवारणीच्या खर्चास आपला हात सैल केला होता. यंदा भाव जास्त राहतील आणि उत्पन्नही हाती येईल. त्याने दोन तीन वर्षात झालेल्या नुकसानीस हातभार लागेल, कर्ज फिटण्यास मदत होईल अशी आशा होती.

मात्र ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धोका दिला. सलग आठ दिवस सततच्या पावसाने पिक वाया गेले. नंतर अतिवृष्टी झाल्याने सर्वच खरीप पिंकाची वाट लागली. पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहता नुकसानग्रस्त पिकांना भरपाईची मागणी होऊ लागली. याचा विचार करता शासनाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली व तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. तिन आठवड्यापूर्वी शासनाने लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता त्यांना मदत मिळण्याची सहानभुती नसल्याने येथील प्रशासनाने अद्याप अहवाल सादर केला नाही. हा अहवाल तयार झाला असुन त्यात काही त्रुटी असल्याची माहिती आहे.

अहवालाबाबत तहसीलदार यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे काम कृषी विभागाचे असल्याचे सांगण्यात आले. तर कृषी विभागाने तहसीलकडे बोट दाखवले. यावरून प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. महसूल मत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास उदासीनता दाखवली जात आहे. ही खेदाची बाब असल्याने संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अहवालावरून प्रशासनाची टोलवाटोलवी
अहवालाबाबत तहसीलदार छगन वाघ यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे काम कृषी विभागाचे असल्याचे सांगितले. तर कृषी विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी तहसील विभागाकडे असल्याचे सांगितले. यावरून प्रशासन पंचनाम्यांच्या अहवालाची माहिती देण्याबाबत टोलवाटोलवी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शेवगाव प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

अहवाल तयार, मग सादर कधी होणार?
तालुक्यात ५ मंडळातील ९४ गांवात अतिवृष्टीने ६८ हजार ५६ बाधीत शेतकऱ्यांचे ४९ हजार १८ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले त्यासाठी ६६ कोटी ६६ लाख ४४ हजार ८०० रुपये तर एरंडगाव मंडळात सततच्या पावसाणे १९ गांवात ११ हजार २७८ शेतकऱ्यांचे ५ हजार ९८५ हेक्टर बाधित क्षेत्रास ८ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये मदतीचा अहवाल तयार झाला आहे, असे म्हटले जाते. मग तो शासन दरबारी कधी सादर होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...