आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बनावट वाराई पुस्तक छपाई प्रकरणी कारवाईची मागणी; उपोषणाचा इशारा

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माथाडी कामगार मंडळाचे बनावट वाराई पुस्तक छपाई प्रकरण माथाडी निरीक्षक व सहाय्यक कामगार आयुक्त दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत या प्रकरणातील आरोपी व त्यांना पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सह्याद्री छावा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले असून उपोषणाचा इशारा दिला आहे.

शहरात माथाडी कामगार मंडळाचे बनावट वाराई पुस्तक छपाई प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधाराचे निलंबन करण्यात आले होते. मात्र पुन्हा त्याला कामावर रुजू करुन घेण्यात आले. माथाडी निरीक्षक व सहाय्यक कामगार आयुक्त प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. २२ नोव्हेंबर रोजी उपोषण करण्यात आले होते. दोन दिवासानंतर लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, संबंधितांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात कारखानदार व धनदांडग्याशी हात मिळवणी करून कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, माथाडी कामगार मंडळाच्या बनावट वाराई पुस्तक छापाई प्रकरणामध्ये दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सह्याद्री छावा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी दखल न घेतल्यास १९ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...