आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जल जीवन मिशनची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

शेवगाव शहर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या कामाच्या निवेदा प्रक्रीयेत अनियमितता झालेली असुन हि निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जल जीवन मिशन योजनेच्या कोट्यावधी रूपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवली गेली पंरतु या निविदा प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झालेला आहे, असे मनसेचे म्हणणे अाहे.

कोट्यावधी रूपयांच्या कामाचे वाटप ठरावीक ठेकेदारांनी वाटप करुन घेतले असुन यामुळे सुशिक्षित बेरोजगार व ईतर छोट्या ठेकेदारांवर हि निविदा प्रक्रिया अन्याय कारक आहे. यामुळे हि निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रशासनकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...