आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रामवाडी परिसरात विस्कळीत पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रामवाडी परिसरात काळुबाई मंदिरा जवळील नळांना पिण्याचे पाणी अनेक दिवसापासून येतच नसून रामवाडी परिसरात विस्कळीत पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष रियाज कुरेशी यांच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन दिले.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ सय्यद, समवेत अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, चंदू किरुरकर, दिलावर सय्यद, कादिर शेख, युनुस शेख, शमा शेख, मंगल कांबळे, आशा परदेशी, माया साबळे, रमेश वैरागर, मतीन शेख, ताराबाई घोरपडे, महादेव खंडागळे, माधुरी गायकवाड उपस्थित होते.

रामवाडी परिसरात ज्या ठिकाणी नळाला पाणी येत नाही त्या ठिकाणी दोन इंची लाइन असल्याने सर्वांना पाणी मिळत नाही. येथे चार इंची लाईन टाकून द्यावी. अन्यथा येत्या आठ दिवसात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा च्या वतीने मनपा कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...