आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय नोकरी:प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकल्पग्रस्तांचा १३ वर्षांपासूनचा वनवास संपवून त्यांना नोकरी देण्याची मागणी दक्ष नागरिक फाऊंडेशनने केली आहे. नोकरीत सामावून घेण्याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुळा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना २००९ साली दाखले दिले. प्रकल्पग्रस्तांना त्वरीत शासकीय सेवेत समावून घेण्याच्या मागणीचे निवेदन दक्ष नागरिक फाऊंडेशनने जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी पंकज लोखंडे, पँमोहन ठोंबे, वैशाली नराल, युसूफ शेख, विजय जाधव, रमेश गायकवाड, किरण चांदेकर, भिवा कोळपे, शिवाजी बाचकर, योगेश बाचकर, सचिन शेरमाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...