आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सोनोग्राफी, एक्सरे मशिन बसवण्याची मागणी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या वतीने मुकुंदनगर, केडगाव आणि बोल्हेगाव येथील नागरी आरोग्य केंद्रे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून बांधण्यात आलेली आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये सोनोग्राफी व एक्सरे मशिन बसविल्यास येथील नागरिकांना नाममात्र दरामध्ये सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे सदरचे मशिन बसवावेत, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे व नगरसेविका मंगल लोखंडे, परेश लोखंडे, हाजी बसमत, हर्षल म्हस्के, मिलिंद भालसिंग, रोहन शेलार, चंद्रकांत पाटोळे आदींनी आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुकुंदनगर, केडगाव आणि बोल्हेगाव येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये सोनोग्राफी व एक्सरे मशिन बसविण्यासाठी आवश्यक खर्चाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करावी व मुकुंदनगर, केडगाव आणि बोल्हेगाव येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये सोनोग्राफी व एक्सरे मशिन बसविण्याबाबत आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...