आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:इंद्रायणी चौकात गतीरोधक बसवण्याची मागणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेल समोर चौकात गतीरोधक बसवण्याची मागणी तपोवन रोड परिसरातील नागरीकांनी कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इंद्रायणी चौकात गतीरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, भाजीपाला व्यवसायिक, बांधकाम व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करीत आहे.

याच रस्त्यावर गरज नसलेल्या ठिकाणी गतीरोधक आहेत. जिथे गरज आहे त्या ठिकाणी गतीरोधक नाहीत. नागरिकांनी मागणी केली आहे. निवेदनावर संदीप पालवे, दत्तू शिरसाठ, अशोक काळे, लक्ष्मण काळे, स्वप्निल कासवा, एस. रहेमान खान, संदीप कीनगे, विक्रम आव्हाड, संतोष लोंढे, सोमनाथ नजन, गोरक्षनाथ दरवडे, रवींद्र कैतके, आसाराम लाहोटी, भगवान आव्हाड यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...