आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:इंदिरा पथ रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी

कोपरगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंदक नाला, बस स्थानक मुख्य रस्त्याप्रमाणे जास्त रहदारीचा असणारा संभाजीमहाराज पुतळा ते गोकुळ नगरी ते टाकळी नाका हा रस्ता मोठा करण्यासाठी व मजबुती करून डांबरी- करणासाठी मोठा निधी नगरपालिकेकडे असूनही दर्जेदार काम होत नाही, तात्काळ रस्त्याचे काम व रस्ता मोठा करण्यासाठी रस्त्यात असलेले अतिक्रमण काढून लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी मंगेश पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, या रस्त्यावरून, शाळा, हॉस्पिटल, धान्य मार्केटसाठी, तसेच शहरालगतील असलेल्या भागातील लोक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र पालिका प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचे काही देणेघेणे नाही. टाकळी नाका ते कोळपेवाडी पेट्रोल पंप पर्यंत खूप खड्डे झाले आहेत व धूळ उडत आहे. तरी तात्काळ ही कामे नगरपालिकेने चालू करून दर्जेदार करावी, अशी मागणी मंगेश पाटील यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...