आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबन:जामखेड बिडीओंचे निलंबन करण्याची मागणी ; अभियंता राजेश सानप यांचे भ्रष्टाचारचे आरोप

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड तालुक्यात पिंपळगाव उंडा येथे सिमेंट रस्ता कामासाठी आम्ही कमी दराची निविदा दाखल केली होती, परंतु, निविदा न भरणाऱ्या ग्रामपंचायतीला कार्यारंभ आदेश देण्यात आला, असा आरोप बेरोजगार अभियंता राजेश सानप यांनी केली. संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करून निलंबन करावे, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केली.

सानप म्हणाले, जामखेड येथील काही कर्मचारी मनमानी पद्धतीने ई- निवेदत हस्तक्षेप करतात. ई-निविदा उघडण्याची प्रक्रिया शासनाच्या नियमाविना होते. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी भरलेल्या निविदा विनानोटीस रद्द करण्यात येतात. पिंपळगाव उंडा, सातेफळ, पांढरवाडी कामांत दिलेल्या कार्यारंभ आदेशांची चौकशी करावी. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मागणी मान्य झाली नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालयसमोर अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

ग्रामपंचायतसाठी टेंडरची आवश्यकता नाही
संबंधित अभियंत्यांची लेखी तक्रार आली होती, आम्ही पिंपळगाव उंडा येथील टेंडर रद्द केले होते. ग्रामपंचायतीने कामाची मागणी केल्यास टेंडर करण्याची गरज नाही. तसेच एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नावाने रजिस्ट्रेशन होते, लक्षात आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला काम दिले नाही. हे विषय त्याचवेळी मिटले होते, संबंधित अभियंत्यांनी तक्रार नसल्याचे लेखी आमच्याकडे दिले आहे.'' प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड.

बातम्या आणखी आहेत...