आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मारहाण करून घर जाळणाऱ्या‎ आरोपींना अटकेची मागणी‎

नगर‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून निवृत्त शिक्षकाच्या परिवाराला मारहाण‎ करून घर जाळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींना अटक‎ करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाज संघटनेच्या‎ वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात‎ आले. आंदोलन सुरू असतानाच अधीक्षक राकेश ओला हे‎ कार्यालयात येत होते. आंदोलकांमध्ये दिव्यांग व्यक्ती‎ असल्याचे दिसताच त्यांनी स्वतः जाऊन त्यांचे निवेदन‎ स्वीकारले.‎ सारोळा अडवाई (ता. पारनेर) येथे निवृत्त शिक्षक वैराळ‎ यांच्या परिवाराला काही समाजकंटकांनी मारहाण करून‎ त्यांचे राहते घर जाळून टाकले.

या मारहाणीत पल्लवी अनिल‎ वैराळ, वंदना कांतीलाल वैराळ, निलम पप्पु वैराळ, पप्पु‎ कांतीलाल वैराळ, संजय दादु वैराळ हे जखमी झाले आहेत.‎ वंदना कांतीलाल वैराळ यांचा मारहाणीत पाय मोडला आहे.‎ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दत्तात्रय‎ आबाजी फंड, भास्कर आबाजी फंड, शुभम भास्कर फंड,‎ हौसाबाई आबाजी फंड यांच्यावर गुन्हा दाखल असून ते त्यांना‎ पोलीस प्रशासनाने अटक करावी.

तसेच अन्याग्रस्तांना पोलिस‎ संरक्षण देवून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली‎ आहे. तीन दिवसात आरोपींवर कारवाई न झाल्यास‎ कार्यालयासमोर सकल मातंग समाज व सकल‎ संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा सुनील उमाप,‎ सुनील सकट, अनिल शेकटकर, नामदेवराव चांदणे, दत्तात्रय‎ घोडके, गणेश शेकटकर आदींनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...