आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा काळया फिती लावून निषेध:आपले गुरुजी मोहिमेंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व शाळांना शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. या दोन्ही घटनांचा शिक्षक भारती संघटनेने काळया फिती लावून निषेध केला. मागणीचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले, असे संघटनेचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. केवळ अपवादात्मक प्रकरणात काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे योग्य नाही. आपले गुरुजी मोहिमेंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून, तसे आदेश द्यावेत, अशी मागणी आप्पासाहेब जगताप, बाबासाहेब लोंढे, सचिव विजय कराळे, आशा मगर आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...