आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवर्तन:मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

कौठा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी डिसेंबरमध्ये पहिले आवर्तन होणे गरजेचे होते. परंतु जानेवारी सुरू होऊन ही पाटील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून होत नसल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत आला आहे.धरण गेल्या पावसाळ्यात शंभर टक्के भरलेले असताना पाणी देण्यास उशीर होत असल्याने व उष्णता वाढत आहे. तरीही आवर्तन सोडण्यासाठी नियोजन होत नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना केली आहे.

मुळा धरणातून शेतीसाठी उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन डिसेंबर २०२२ मध्ये आवश्यक होते. शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन महत्त्वाचे आहे. पंरतु जानेवारी सुरू तरीही पाटबंधारे विभागाकडून पाट पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने रब्बी हंगाम अडचणीत आला आहे. ऐन मोसम मध्ये हंगाम असून सर्व पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे.

उन्हाचा उकाडा वाढत आहे. विहिरी बोओर याचे पाणी देऊनही पिकांची वाढ होईना.उशीरा आवर्तन कोणासाठी सोडणार असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम संपल्यानंतर पाणी सोडणार का ? शेतकऱ्यांची कांदा लागवड, गहू, मका,व अन्य पिकांना उष्णतेमुळे पाट पाण्याची आवश्यकता असताना अजुनही आवर्तन सोडण्यासाठी नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत .तातडीने मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी करत आपली नाराजी व्यक्त केली.

‘पाटबंधारे’कडून पाण्याचे नियोजन नाही
मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी होत असताना पाटबंधारे विभागाकडून पाट पाण्याचे नियोजन केले जात नाही, तर मागील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आवर्तनाचे नियोजन होत नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात येत आहे.''- तुळशीदास शिंदे, सरपंच, फत्तेपूर.

बातम्या आणखी आहेत...