आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Demanding The Arrest Of All The Accused Who Were Lying On The Road In Full Sun; Stop The Road Of Lahuji Shakti Sena On Ghodnadi Kamani Bridge At Shirur |marathi News

श्रीगोंदे:भर उन्हात रस्त्यावर लोटांगण घेत केली सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी; शिरूर येथे घोडनदी कमानी पुलावर लहुजी शक्ती सेनेचा रस्ता रोको

संताप2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत मनेश आव्हाड (वय २७) या मातंग समाजाच्या तरुणाची निर्दयीपणे हत्या केली. मनेशच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भर उन्हात डांबरी रस्त्यावर लोटांगण घेत, प्रशासनाच्या नावाने बोंबा मारत लहुजी शक्ती सेनेच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नगर -पुणे महामार्ग शिरूर येथे घोडनदी सतरा कमानी पुलावर करण्यात आले.

हे आंदोलन लहुजी शक्ती सेना कोर कमिटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.हेमंत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, आंदोलनात शिरुर,श्रीगोंदे तालुक्यातील लहुजी शक्ती सेना मातंग समाज बांधव सहभागी झाले हाेते. २० एप्रिल रोजी मनेश आव्हाड (वय २७) या मातंग समाजाच्या तरुणावर औरंगाबाद येथे चोरीच्या संशयावरून हल्ला करण्यात आला होता. त्याचे हात-पाय बांधून निर्दयीपणे लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करुन याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर दहशत निर्माण करण्यासाठी पाठवला होता. या घटनेतील सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच काही आरोपींना अटक करण्यात आली नाही, ते फरार आहेत. लहुजी शक्ती संघटनेने आंदोलन दुपारी एक वाजता चालू केले. आंदोलन ठिकाणी शिरूर श्रीगोंदे येथील पोलिस प्रशासनानक निवेदन घेऊन आंदोलन सोडवले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.हेमंत खंदारे,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,श्रीगोंदे तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे,कार्याध्यक्ष राजाराम काळे,जिल्हा संघटक लखन साळवे, प्रवीण कुमार शेंडगे,प्रकाश साळवे,वसंत औचिते, आप्पा रोकडे, अनिकेत शेंडगे, राजू मोटे,नंदूभाऊ ससाने,विशाल जोगदंड, नगरसेवक दादाभाऊ लोखंडे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन दादाभाऊ लोखंडे, प्रफुल्ला आडगळे, नानू भवाळ, पप्पू शेंडगे,सचिन काळोखे, तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना महिला मोनिका जाधव,शहराध्यक्ष संध्या जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष फुलाताई थोरात, बबई नाडे, आकाश पवार,पप्पू साळवे,प्रशांत औचिते,आबासाहेब बोरगे,अशोक चव्हाण, संदीप औचिते,सागर गायकवाड,मंगल पठारे, पुष्पा शेंडगे,संतोष गोरखे,तुषार गोरखे,नामदेव सकट,मोहन सकट,अमोल बोरगे,रामराव चव्हाण,योगेश मोटे, भाऊसाहेब औचिते, प्रशांत मोरे,राजु सकट,दादा सकट आदी उपस्थित होते.

दखल न घेतल्यास ‘मातोश्री’ला घेराव घालू
या प्रकरणाने सर्व समाजाच्या भावना तीव्र आहे. यामधील सर्व आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करून आव्हाड कुटुंबाला शासनाने मदत करावी, काही आरोपींना अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यामागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दखल न घेतल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्री वर लहुजी शक्ती सेना व मातंग समाज घेराव घालतील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...