आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:नगर शहरातील बाप्पांना राज्याच्या विविध भागातून मागणी ; परजिल्ह्यात मुर्त्या रवाना

नगर / महेश पटारे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे बंद असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मोठया उत्साहात साजरा होणार आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नगरमध्ये तयार होणाऱ्या गणेशमुर्त्यांना राज्यभरात मागणी आहे. अनेक मंडळांनी दोन महिन्यांपूर्वीच मुर्त्यांचे बुकिंग केले आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे मूर्तीच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या असल्याचे मूर्ती विक्रेते सांगत आहेत.

नगरमध्ये गणपती मूर्तीकारांचे जवळपास २५ कारखाने आहेत. त्यात २ ते ३ इंचापासून १२ ते १५ फूट उंचीच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. छोट्या मंडळांसाठी तसेच घरगुती मागणीसाठी ३ इंच ते दोन फूट उंच आकाराच्या मूर्त्या मोठ्या संख्येने असतात. नगरच्या गणेशमूर्तींना औरंगाबाद, नाशिक, जळगाव, मराठवाडा, बीड, जळगाव, पुणे आदी जिल्ह्यांतही मागणी आहे. यंदा विठ्ठल, बाहुबली, सावकार, दगडूशेठ, लालबागचा राजाच्या मूर्त्यांना मागणी आहे.

कोरोनाचे निर्बंध काही महिन्यांपूर्वी हटवल्यामुळे यंदा मूर्त्यांची संख्या कमी आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर रंग, माती, सजावटीच्या वस्तू आणि कारागिरांचा खर्च वाढला आहे. एका कारखान्यात २५ ते ३० कामगार कार्यरत आहेत. बेस कलर, पीओपी, दागिने आदी कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्याने यंदा मुर्तीच्या किंमतीतही वाढ झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागल्या आहे. यावेळी अडीच ते तीन लाख मातीच्या मूर्तीची मागणी आहे, परंतु त्या प्रमाणात माती उपलब्ध नसल्यामुळे मूर्तिकारांचीही अडचण झाली आहे. गणेशोत्सव दहा दिवसांवर आला असताना मूर्तिकारांचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेश भक्तांसह जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, महागाईचा परिणाम गणेश उत्सवावरही दिसत आहे.

दहा वर्षे मजुरी, यंदा स्वत:चा लघुद्योग
मी गेली दहा वर्षे इतर गणपती कारखान्यांमध्ये मजुरीकाम केले. कोरोनामुळे तेही बंद झाले होते. पण, यावर्षी कुटुंबियांच्या मदतीमुळे घरीच छोट्या व घरगुती वापराच्या मूर्ती तयार केल्या. जवळपास तीनशे मूर्ती आधीच बूक होत्या. आता कल्याण रोडवर स्वत:चा स्टॉल लावला आहे. यावर्षी चांगला व्यवसाय होण्याची शक्यता आहे.''
अनिता अशोक जाधव, मूर्तीकार.

बातम्या आणखी आहेत...