आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:कनोली येथे मालदाडच्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांकडून प्रात्यक्षिक

पिंपरणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा संस्कार संस्थेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय येथील कृषिदुतांकडून जागरूकता सुरुवात झाली. मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालय यांच्या ग्रामीण व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमास सुरुवात झाली.

कनोली (ता. संगमनेर) गावात अनिकेत अवधुत बनकर, प्रथमेश अभंग, संकेत आंधळे, रोहन आदिक था कृषिदूतांचे आगमन झाले. यावेळी गावचे सरपंच भरत पवार, उपसरपंच अर्चना वर्पे, ग्रामसेवक भरत अहेर उपस्थित होते. अभ्यासदौऱ्या दरम्यान कृषिदूत हवामान आधारित शेती, माती परीक्षणाचे महत्त्व, एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन, पशु संवर्धन, गांडूळखत प्रक्रिया एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण इत्यादी विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देणार आहेत. या सर्व कार्यक्रमास सेवा संस्कार संस्थेचे साहेबराव नवले, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. एल. हारदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. तायडे, कार्यक्रम अधिकारी विषय शिक्षकांचे कृषिदुतांस मार्गदर्शन लाभत आहे.

बातम्या आणखी आहेत...